





‘लाल रंग ‘… देवीचा अतिशय प्रिय रंग… शक्तितत्वाचे दर्शक म्हणून देवीची पूजा आपण कुंकुवाने करतो. देवीचा नामजप करत देवीच्या चरणांवर अथवा सर्वांगावर कुंकुवाने स्नान घालण्याचा सोहळा म्हणजेच कुंकुमार्चन, शास्त्रात अस विधान आहे की ते कुंकू आपण लावल्यावर अथवा घरी ठेवल्यावर देवीची असीम कृपा प्राप्त होते. अक्षय्य लक्ष्मी प्राप्ती होऊन कार्यसिद्धी होते. आपल्याला सौभाग्य प्राप्त होऊन आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात.
आपल्या कोल्हापूर मध्ये, आई जगदंब अंबाबाई महालक्ष्मीच्या वास्तव्याने पावन झालेल्या महाशक्तिपीठं भूमीत श्री कार्यसिद्धी मंदिरामध्ये होणाऱ्या सहस्त्रचंडी महायाग सोहळ्या प्रसंगी हे सौख्यदायी कुंकुमार्चन होत असल्यामुळे त्याचे महत्व असंख्य पटीने वाढणार आहे. अदभुत असा देवी दुर्मिळ योग. अशा या अभूतपूर्ण सोहळ्याप्रसंगी अगत्यपूर्वक येणे करून देवीकृपेचा लाभ घ्यावा. कुंकुमार्चन सोहळ्यासाठी अधिकाधिक संख्येने स्त्रियांनी उपस्थित रहावे ही विनंती..
शुक्रवार, १८ ऑगस्ट २०२३
‘श्रीं’च्या मूर्तिचे मंदिरात आगमन,
गणेश याग,
उदकशांती ,
‘श्रीं’च्या मूर्तीस अधिवासाचा प्रारंभ
शनिवार, १९ ऑगस्ट २०२३
‘श्रीं’च्या मूर्तीस अधिवास व महा अभिषेक विधी
रविवार, २० ऑगस्ट २०२३
‘श्रीं’च्या मूर्तीस अधिवास तथा सहस्त्रचंडी पाठ आरंभ, मूर्ती प्रधान हवन, कुंकूमार्चन आरंभ (वेळ : स. ११ ते दु.१)
सोमवार, २१ ऑगस्ट २०२३
‘श्रीं’च्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण, सहस्त्रचंडी पाठ, कुंकूमार्चन (वेळ : स. ११ ते दु. १)
मंगळवार, २२ ऑगस्ट २०२३
कुंकूमार्चन व सहस्त्रचंडी पाठ (वेळ : स. ११ ते दु. १)
बुधवार, २३ ऑगस्ट २०२३
कुंकूमार्चन व सहस्त्रचंडी पाठ (वेळ : स. ११ ते दु. १)
गुरुवार, २४ ऑगस्ट २०२३
सहस्त्रचंडी महायाग हवन, पुर्णाहूती