‘श्री दुर्गा सप्तशती ग्रंय’ दुर्गा सप्तशती देवीचे चरित्र वर्णन करणारा ग्रंथ आहे. या ग्रंथात १३ अध्याय असून, तो तीन भागात विभागण्यात आला आहे. दुर्गा सप्तशतीमधील प्रत्येक अध्यायात भगवती देवीचा महिमा, महती. महात्म्य आणि देवीच्या स्वरुपांविषयी वर्णन करण्यात आले आहे. दुर्गा सप्तशतीच्या पहिल्या भागात मधु कैटभ व्यकया, मध्यक्रमात महिषासुर संहार आणि उत्तरार्थात शुंभ-निशुंभ वध तसेच देवीकडून सुस्थ आणि वैश्य यांना देण्यात आलेल्या वरदानांविषयी विस्तृत माहिती देण्यात आली आहे. दुर्गा सप्तशती ग्रंथाचे १००० पाठ व दशांश हवन अशा अद्वितीय, दुर्मिळ आणि शक्तिशाली सहस्त्रचंडी यज्ञाचा अभूतपूर्व असा महायाग सोहळा कोल्हापूरच्या महाशक्तिपीठ भूमीत १५ वर्षांनी प्रथमच श्री कार्यसिद्धी मंदिर प्रांगणामध्ये दि. २० ते २४ ऑगस्ट २०२३ पर्यंत संपन्न होणार आहे.
सहस्त्रचंडी यज्ञ….. • नवदुर्गेचा अखंड कृपाशिर्वाद मिळावा म्हणून विधिपूर्वक केली जाणारी अशी एक शक्तिशाली पूजा ज्यात आई दुर्गेची उपस्थिती, शक्ती आणि आशीर्वाद ह्याचा देवी, शक्तिशाली, जीवंत अविस्मरणीय असा अनुभव घेता येतो. शास्त्रात वर्णन केलेल्या विधानानुसार आईच्या कृपेमुळे अनेक संकटातून बाहेर पडण्यास मोलाची मदत होते. सर्व मनोरयसिध्दी, कीर्ती, धनसंपदा प्राप्ती, संतती, आरोग्य, संपन्नता इत्यादी सर्व मनोकामना देवीकृपेने प्राप्त होतात. असा हा दुर्मिळ यज्ञ अनुभवायला मिळणे म्हणजे आपली पूर्वपुण्याईच… परमभाग्य…
आईचा कृपार्शिवाद, भक्ती, साधना, आराधना आणि उपासना ह्याचा लाभ घेण्यास सर्वांनी अगत्यपूर्वक येणेचे करून आपण सर्व आईच्या प्रेमळ कृपा वर्षावात न्हाऊन निघूया.. आईच्या नामात दंग होऊया… स्वामी आई जगदंब चरणी लीन होऊया.. जीवनाचे सार्थक करूया.
‘लाल रंग ‘… देवीचा अतिशय प्रिय रंग… शक्तितत्वाचे दर्शक म्हणून देवीची पूजा आपण कुंकुवाने करतो. देवीचा नामजप करत देवीच्या चरणांवर अथवा सर्वांगावर कुंकुवाने स्नान घालण्याचा सोहळा म्हणजेच कुंकुमार्चन, शास्त्रात अस विधान आहे की ते कुंकू आपण लावल्यावर अथवा घरी ठेवल्यावर देवीची असीम कृपा प्राप्त होते. अक्षय्य लक्ष्मी प्राप्ती होऊन कार्यसिद्धी होते. आपल्याला सौभाग्य प्राप्त होऊन आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात.
आपल्या कोल्हापूर मध्ये, आई जगदंब अंबाबाई महालक्ष्मीच्या वास्तव्याने पावन झालेल्या महाशक्तिपीठं भूमीत श्री कार्यसिद्धी मंदिरामध्ये होणाऱ्या सहस्त्रचंडी महायाग सोहळ्या प्रसंगी हे सौख्यदायी कुंकुमार्चन होत असल्यामुळे त्याचे महत्व असंख्य पटीने वाढणार आहे. अदभुत असा देवी दुर्मिळ योग. अशा या अभूतपूर्ण सोहळ्याप्रसंगी अगत्यपूर्वक येणे करून देवीकृपेचा लाभ घ्यावा. कुंकुमार्चन सोहळ्यासाठी अधिकाधिक संख्येने स्त्रियांनी उपस्थित रहावे ही विनंती..