‘श्री दुर्गा सप्तशती ग्रंथ’ दुर्गा सप्तशती देवीचे चरित्र वर्णन करणारा ग्रंथ आहे. या ग्रंथात १३ अध्याय असून, तो तीन भागात विभागण्यात आला आहे. दुर्गा सप्तशतीमधील प्रत्येक अध्यायात भगवती देवीचा महिमा, महती, महात्म्य आणि देवीच्या स्वरुपांविषयी वर्णन करण्यात आले आहे. दुर्गा सप्तशतीच्या पहिल्या भागात मधु कैटभ वधकथा, मध्यक्रमात महिषासुर संहार आणि उत्तरार्धात शुंभ-निशुंभ वध तसेच देवीकडून सुरथ आणि वैश्य यांना देण्यात आलेल्या वरदानांविषयी विस्तृत माहिती देण्यात आली आहे. दुर्गा सप्तशती ग्रंथाचे १००० पाठ व दशांश हवन अशा अद्वितीय, दुर्मिळ आणि शक्तिशाली सहस्त्रचंडी यज्ञाचा अभूतपूर्व असा महायाग सोहळा कोल्हापूरच्या महाशक्तिपीठ भूमीत १५ वर्षांनी प्रथमच श्री कार्यसिद्धी मंदिर प्रांगणामध्ये दि. २० ते २४ ऑगस्ट २०२३ पर्यत संपन्न होणार आहे.